पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ घडली. अमित शेषराव सरदेशपांडे (वय ४२, रा. सुंदर सहवास सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
दुचाकीस्वार सरदेशपांडे बाह्यवळण मार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याने नऱ्हेकडे निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सरदेशपांडे यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून वाहनचालकाविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.