बॉलीवूडमधील बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर-खान ही काही महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाली होती. यानंतर ती पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी सज्ज झाली असून, तिची डिमांडही कायम आहे. हन्सल मेहताच्या एका चित्रपटात ती काम करणार आहे. याशिवाय “वीरे दी वेडिंग-2’चेही तिने प्लॅनिंग सुरू केले आहे.
View this post on Instagram
करिना कपूरला “सीता’ नामक एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटातील भूमिकाही करिनाला आवडली आहे. परंतु या चित्रपटात काम करण्यासाठी करिनाने तब्बल 12 कोटी रुपये मानधन मागितले आहे.
View this post on Instagram
सामान्यतः करिना 6 ते 8 कोटी रुपये एका चित्रपटासाठी घेत असते. करिनाने एवढी मोठी रक्कम मागितल्याने चित्रपट निर्माता चकित झाले आहे; परंतु कमी मानधन घ्यावे यासाठी ते करिनाला विनंती करणार असल्याचे समजते. परंतु करिनाने ही विनंती मान्य न केल्यास या भूमिकेसाठी अन्य अभिनेत्रीला ऑफर देण्यात येऊ शकते.
View this post on Instagram
यासंदर्भात करिनाच्या निकटवर्तीयाने सांगितले की, “सीता’ चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी करिनाला 8 ते 10 महिन्यांचा कालावधी द्यावा लागणार होता, तर अन्य चित्रपटाचे काम दोन महिन्यांत पूर्ण होते.
View this post on Instagram
यामुळे करिनाचे मत आहे की, जर चित्रपटासाठी जास्त कालावधी द्यावा लागणार असल्यास मानधनही जास्त दिले पाहिजे. आता करिना कपूर-खान ही मानधन कमी करते की, दुसऱ्या अभिनेत्रीला सीता होण्याची संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.