बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार याचा 2012मध्ये प्रदर्शित झालेला “ओह माय गॉड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. या चित्रपटात अक्षयसह परेश रावलने मुख्य भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट तयार करण्यात येत आहे.
View this post on Instagram
“ओह माय गॉड-2′ या चित्रपटाचे शूटिंग मे-जूनमध्ये करण्यात येणार होते. मात्र, करोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने शूटिंग लांबणीवर पडले आहे. आता देशात करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
या सिक्वलमध्ये अक्षयकुमारसोबत पंकज त्रिपाठी मुख्य भूमिका साकारणार आहे. आता चित्रपटात आणखी एका हिरोईनची एंट्री झाली आहे. ती म्हणजे यामी गौतम ही “ओह माय गॉड-2’मध्ये झळकणार आहे. यामी गौतम सध्या तिच्या लग्नामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिने 4 जून रोजी दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत लग्न केले आहे.
View this post on Instagram
यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.”ओह माय गॉड-2’मध्ये परेश रावलच्या जागी पंकज त्रिपाठी झळकणार आहेत. त्यातच आता यामी गौतमची एंट्री झाल्याने चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात अक्षयकुमार हा मागीलप्रमाणे भगवान कृष्णची भूमिका साकारणार आहे.
सध्या चित्रपटाची टीम ही प्री-प्रोडक्शनच्या कामाची तयारी करत आहे. तसेच शूटचे लोकेशन आणि कोणत्या शहरात सेट उभारावेत, याचे नियोजन करत आहे. या चित्रपटाची निर्मिती अश्विन वर्दे करत आहे.