बंगळुरू – देशात करोना रुग्ण वाढत असताना केंद्र सरकारने तातडीने लसीकरण मोहीम हाती घेतली. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लसीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली.
देशातील करोना लसीकरण मोहिमेबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकारतर्फे मोफत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवण्यात आली होती.
.@PMOIndia has announced free vaccination to all the citizens above the age of 18 years.
Thanks to Honourable Supreme Court!! pic.twitter.com/mmvSum8ZHC
— Siddaramaiah (@siddaramaiah) June 7, 2021
पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी एक ट्विट करून भाजपला खोचक टोला लगावला आहे. ‘देशाच्या पंतप्रधानांनी १८ वर्षांवरील सर्वांचे विनामूल्य लसीकरण करणार असल्याचे जाहीर केले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार, असे ट्विट सिद्धरामय्या यांनी केलं आहे. सिद्धरामय्या यांनी ट्विटसोबत लसीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेल्या काही बातम्यांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.