पुणे : करोनाला रोखण्यासाठी देशातील डॉक्टर्स रात्रंदिवस एक करताना दिसत आहेत. २४ तास अंगात पीपीई किट घालून रुग्णांची सेवा करण्याचे काम डॉक्टर्स करत आहेत. पीपीई किट घालून २४ तास वावरणे सर्वात कठीण काम असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. मात्र याच पीपीई कीटवर पुण्यातील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गारेगार असा तोडगा शोधून काढला आहे.
पुण्यात राहणाऱ्या निहाल सिंह आदर्श याने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तयार करण्यात आलेल्या किटचा उपयोग सर्वानाच होणार असून सर्वात जास्त उपयोग हा करोना योद्धयांसाठी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे पीपीई किट घालणार्या व्यक्तीला यात गर्मीचा कोणताही त्रास जाणवणार नाही उलट यातून थंड हवा मिळणार आहे.
पीपीई किटसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी मे 2020 मध्ये सुरुवात केली होती.मुंबईच्या के.जे.सोमय्या इंजिनियरिंग कॉलेजने एक प्रोजेक्ट सुरू केला होता.हे डिव्हाईस बनवण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी त्याला मदत केली आहे.
Maharashtra | Nihaal Singh Adarsh, an engineering student from Pune, has developed ‘Cov-Tech’, a compact ventilation system for PPE kits
“It is hot & humid within PPE suit, this system creates a steady airflow. Takes surrounding air, filters & pushes it inside,” he said (24.05) pic.twitter.com/ARveNj59Jv
— ANI (@ANI) May 24, 2021
“मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत होतो. मी पाहिले की, कोविड रूग्णांचा उपचार करणार्या डॉक्टरांना पीपीई किटमध्ये खुप त्रास होतो. यासाठी मी या डिव्हाईसबाबत विचार केला. माझी कल्पना कॉलेजने सिलेक्ट केली आणि परवानगी दिली की मी पुण्यातून मुंबई कॉलेजमध्ये लॉकडाऊन दरम्यान या प्रोजेक्टवर काम करू शकतो”, असे निहालने सांगितले.
“पीपीई किट एकवेळच्या वापरानंतर बदलला तरी हा डिव्हाईस पुन्हा दुसर्या किटसाठी सतत वापरता येतो. या डिव्हाईसची किंमत जवळपास साडेचार हजार रूपये आहे आणि तो सहजपणे पीपीई किटमध्ये फिट करता येतो. हा डिव्हाईस केवळ 100 सेकंदाच्या आत वापरकर्त्याला ताजी हवा देतोअसे निहालने म्हटले.
कूलिंग पीपीई किट तयार करण्याबाबत निहालने म्हटले की, हा मी केवळ माझी आई डॉ. पूनम कौर आदर्श यांना दिलासा देण्यासाठी बनवला होता, जी आदर्श क्लिनिक, पुणेमध्ये कोविड -19 रूग्णांचा उपचार करत आहे. हे क्लिनिक त्या स्वतः चालवतात.