चेन्नई – देशात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांत लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. लोक एकत्र येऊन संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी लग्न समारंभांवर निर्बंध आहेत. मात्र तामिळनाडू येथील जोडप्याने अनोख्या पद्धतीने विवाह केलाय. या जोडप्याने एक विमान बूक करून उंच आकाशात 161 वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधलीय.
सविस्तर माहिती अशी की, मदुराई येथील राकेश आणि दक्षिणा यांना मोठ्या धुम धडाक्यात लग्न करायचे होते. मात्र लाॅकडाऊनमुळे विवाहावर निर्बंध असल्याने त्यांनी उंच आकाशात लग्नगाठ बांधण्याचे ठरवले. या जोडप्याने एक विमान किरायाने घेऊन 161 वऱ्हाडींच्या उपस्थितीत धुम धडाक्यात उंच आकाशात सात फेरे घेतले. राकेश-दक्षिणाने आपल्या या विवाहाचा व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Rakesh-Dakshina from Madurai, who rented a plane for two hours and got married in the wedding sky. Family members who flew from Madurai to Bangalore after getting married by SpiceJet flight from Bangalore to Madurai. #COVID19India #lockdown @TV9Telugu #weddingrestrictions pic.twitter.com/9nDyn3MM4n
— DONTHU RAMESH (@DonthuRamesh) May 23, 2021
‘मदुराईच्या राकेश-दक्षिणा यांनी दोन तासासाठी विमान किरायाने घेऊन उंच आकाशात लग्नगाठ बांधली. कुटुंबातील सदस्य मदुराईहून बंगलुरूला गेले होते आणि लग्नानंतर स्पाईसजेटने बंगलुरूहून मदुराईला परत आले,’ असे कॅप्शन देऊन राकेशच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
डीजीसीए ने केली कारवाई –
सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या लग्नाच्या व्हिडीओत राकेश दक्षिणाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत असल्याचे दिसते. यावेळी वऱ्हाडी मंडळी आनंदाने जोडप्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसतात. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीजीसीएने याप्रकरणी कारवाई केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.