पुणे – पोलिसांना आव्हान देणाऱ्या लॅंड माफिया पिट्याभाई टोळीचा अजून एक कारनामा उघडकीस आला आहे. बनावट खरेदीखत करून देऊन लाखोंचा गंडा घालण्यात आल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॅंडमाफिया पिट्याभाई उर्फ मेहबूब शेख यांच्या टोळीने जागेचे आमिष दाखवत बनावट व्यक्ती उभी करून बनावट खरेदीखत करून देऊन राहते घर विकावयास भाग पाडून 13 लाख रुपये लुबाडले असल्याची तक्रार फईम चंद शेख (रा.स.न.75, सय्यदनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सर्व पुरावे सादर करत दिली आहे.
या तक्रारीवरून लॅंडमाफिया पिट्याभाई उर्फ मेहबूब शेख त्याचे साथीदार असिफ गुलाब शेख, अझर बशीर सय्यद, राज गुलाब शेख, सज्जाद मौलाना, आयुब बशीर खान, आरिफ नईमुल्ला शेख, अशफाक मोहम्मद रफिक शेख (सर्वजण राहणार सय्यदनगर, हांडेवाडी रोड, हडपसर आणि कोंढवा परिसर) यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार फईम चंद शेख यांना पिट्याभाई उर्फ मेहबूब शेख त्याचे साथीदार अझर बशीर सय्यद, सज्जाद मौलाना, आयुब बशीर खान, आरिफ नईमुल्ला शेख, अशफाक मोहम्मद रफिक शेख, राज गुलाब शेख, असिफ गुलाब शेख यांनी स.न.63/1/अ/2 मधील जागा बनावट जागा मालक उभा करून गळ्यात मारली. या जागेपोटी तब्बल 13 लाख रुपये या टोळीने उकळले.
त्यांनतर या जागेवर तक्रारदार फईम शेख बांधकाम करण्यास गेले असता मूळ मालकाने त्यांना जागेचा सात बारा दाखवून बांधकाम करण्यास मनाई केली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारदार फईम चंद शेख यांनी या टोळीस रोख आणि व बॅंक खात्यामधून 16 लाख रुपये या जागेपोटी दिले, त्यांनी पिट्याभाई उर्फ मेहबूब शेख त्याचे साथीदार अझर बशीर सय्यद, सज्जाद मौलाना, आयुब बशीर खान, आरिफ नईमुल्ला शेख, अशफाक मोहम्मद रफिक शेख, राज गुलाब शेख, असिफ गुलाब शेख यांनी स.न.63/1/अ/2 मधील जागा बनावट जागा मालक उभा करून गळ्यात मारली.
या जागेपोटी तब्बल 13 लाख रुपये या टोळीने उकळले.त्यांनतर या जागेवर तक्रारदार फईम शेख बांधकाम करण्यास गेले असता मूळ मालकाने त्यांना जागेचा सात बारा दाखवून बांधकाम करण्यास मनाई केली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारदार फईम चंद शेख यांनी या टोळीस रोख आणि व बॅंक खात्यामधून 16 लाख रुपये या जागेपोटी दिले.
त्यांनी पिट्याभाई उर्फ मेहबूब शेख त्याचे साथीदार अझर बशीर सय्यद, सज्जाद मौलाना, आयुब बशीर खान, आरिफ नईमुल्ला शेख, अशफाक मोहम्मद रफिक शेख,राज गुलाब शेख,असिफ गुलाब शेख यांच्याकडे पैसे परत मागितले असता या टोळीने त्यांना पैसे देण्याऐवजी जीवे मारण्याच्या धमक्या देत हाकलून लावले.