कोची: करोनाला दुसरं ठेवण्यासाठी काही गोष्टी प्रामुख्याने करणे आवश्यक आहे त्यात मास्क, सॅनिटायजर आणि सामाजिक अंतर हे आपणास बंधनकारक आहे . तर आता मास्कशिवाय घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. मास्कमध्येही विविध प्रकार फॅशन निर्माण होत आहेत. आपण अनुभवले आहेत. दरम्यान,माईकवाल्या मास्कची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. याची निर्मिती एका केरळमधील तरुणाने केली आहे.
थ्रिसर सरकारी अभियांत्रिकी विद्यालयातील बीई फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मास्कमुळे बोलताना येणारी अडचण लक्षात घेऊन माईकवाला मास्क बनवला आहे. विशेषत: डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन या मास्कची निर्मित्ती करण्यात आली आहे.
Kerala | Kevin Jacob, a first year B Tech student from Thrissur, has designed a mask with a mic & speaker attached to ease communication amid pandemic
"My parents are doctors & they've been struggling to communicate with their patients since the onset of COVID," he said (23.05) pic.twitter.com/pnvkhzZETt
— ANI (@ANI) May 23, 2021
केविन जॉकोब असे या मास्कचं संशोधन करणाऱ्या मुलाचे नाव असून त्याचे वडिल डॉक्टर आहेत. स्वत:च्या वडिलांना बोलताना किंवा संवाद साधाताना मास्कमुळे होणारी अडचण लक्षात घेऊन केविने माईक आणि स्पीकरधारित मास्क बनवला आहे.केविनचे आई-वडिल दोघेही डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना बोलताना होणारा त्रास लक्षात आल्याने केविनने या मास्कच्या निर्मित्तीसाठी प्रयत्न केले.
विशेष म्हणजे या प्रयोगात तो यशस्वीही झाला. त्यानंतर, सर्वप्रथम स्वत:च्या आई-वडिलांनाच त्याने हे मास्क वापरण्यास दिले होते. डॉ. सेनोज केसी आणि डॉ. ज्योती मेरी जोस यांनीही मास्क परिधान करुन कंम्फर्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे, आता या मास्कच्या मागणीनुसार आपण मास्कची निर्मित्ती करणार असल्याचं केविनने एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.
30 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 4 ते 6 तासापर्यंत हा मास्क कार्यान्वित राहू शकतो. या मास्कमध्ये लोहचुंबकाचा वापर करण्यात आला आहे. जवळपास सर्वांनीच मास्कबद्दल चांगली प्रतिक्रिया दिली असून यामुळे मास्क घालून बोलणं अधिक सोयीचं झाल्याचं वापरकर्त्यांनी म्हटलंय. तर, केविनकडून या मास्कचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या कंपनीचा शोध घेण्यात येत आहे.