चंदीगढ – भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. चंदीगढ येथील आपल्या राहत्या घरी ते विलगीकरणात असून आपण लवकरच कोरोनावर मात करून तंदुरूस्त होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फ्लाइंग शिख म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांचे वय आज रोजी 91 वर्षे आहे.
Former Indian sprinter Milkha Singh tested positive for #COVID19. He is in isolation at his home in Chandigarh, confirms his son
(File photo) pic.twitter.com/6DnJEiBLjQ
— ANI (@ANI) May 20, 2021
मिल्खा सिंग यांना बुधवार रोजी रात्री उशीरा 101 डिग्री ताप आला होता. दरम्यान त्यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यानंतर त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याआधी मिल्खा सिंग यांच्या घरातील काही कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
मिल्खा सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे मलाच आश्चर्य वाटतेय. मी पूर्णपणे बरा आहे आणि ताप किंवा सर्दी नाही. तीन-चार दिवसात मी बरा होईन, असे मला डॉक्टरांनी सांगितले आहे. मी कालच जॉगिंगला गेलो होतो.”
मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकली आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. त्यांना फ्लाइंग सिक्ख असे टोपणनाव मिळालेले आहे.
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भाग मिल्खा भाग’ हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित आहे. शिवाय मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.