राजगुरूनगर -खेड तालुक्यात मागील 24 तासांत 173 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर तालुक्यातील जरेवाडी, आंबेठाण येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 462 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
त्यामुळे पुन्हा एकदा बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात बेड्स आणि रेमडेसिविर बाबत ओरड कमी झाली आहे तर दुसरीकडे लसीकरण लस उपलब्ध नसल्याने बंद झाले असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मागील 24 तासांत चाकण (22), आळंदी (10), राजगुरूनगर (8) या तीन नगरपरिषदांच्या हद्दीत 40. ग्रामीण भागातील खराबवाडी (12), भोसे (11), मेदनकरवाडी (9),वाकी बुद्रुक (7), सावरदरी, मरकळ (प्रत्येकी 6), नाणेकरवाडी (5), ढोरेभांबुरवाडी, चांदूस, कुरुळी, शिरोली (प्रत्येकी 4), आंबेठाण, जरेवाडी, चऱ्होली खुर्द, धानोरे, कोहिंडे बुद्रुक, वासुली (प्रत्येकी 3),
बिरदवडी, चिंबळी, काळूस, केळगाव, निघोजे, निमगाव, वडगावघेणंद, सांडभोरवाडी, राक्षेवाडी, शिवे, सोळू, खरपुडी बुद्रुक, वराळे (प्रत्येकी 2), आसखेड खुर्द, भांबोली, बुरसेवाडी, चांडोली, चिखलगाव, दरकवाडी, गोसासी, होलेवाडी, कडाचीवाडी, काळेचीवाडी, मोई, पाचारणेवाडी, रानमळा, शेलू, वडगाव पाटोळे, वाकी खुर्द, येलवडी (प्रत्येकी 1)
असे 47 गावांमध्ये 133 तर एकूण 173 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 25 हजार 716 बाधित आढळून आले आहेत, त्यापैकी 22 हजार 683 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 276 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 757 बाधितांवर उपचार सुरू आहेत.