नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परिस्थिती नियंत्रणा बाहेर करून सोडली आहे. त्यातच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच जात आहे. देशात एकीकडे ही परिस्थिती सुरु आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून आता सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील आता पंतप्रधानांवर यावरूनच निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. करोनामुळे हे काम रोखण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. करोना स्थितीत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे. ‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला करोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.
देश को PM आवास नहीं, सांस चाहिए! pic.twitter.com/jvTkm7diBm
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 9, 2021
नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी शनिवारी ट्वीटमधून केली होती. ‘जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए’, असे ट्वीट त्यांनी केले होते. त्याचबरोबर हॅशटॅग जीएसटीचाही वापर केला होता.
विस्टा प्रकल्प संसदेसमोरील १३ एकर जमिनीवर उभा राहात आहे. सध्या या जमिनीवर पार्क, पार्किंग आहे. ते हटवून त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभेची इमारत उभी केली जात आहे. या प्रकल्पासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.