‘मुख्यमंत्री साहेब प्लीज..! लग्नांवर बंदी घाला, म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडचेही लग्न थांबेल’

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा करोनाने परिस्थिती चिंताजनक करून सोडली आहे.   महाराष्ट्रात सह अनेक राज्यांमध्ये करोनाची साकडी तोडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.  लॉक डाउन असतांना सरकारकडून गाईड लाईन्स देण्यात आली आहे. यात  लग्नासाठी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे.

यातच राजस्थानमध्ये करोनाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ज्यांच्या घरांमध्ये लग्न समारंभ आहेत त्यांनी तो सध्यातरी पुढे ढकलावा. अशी विनंती ही केली आहे. यावर आता सोशलवर युजर्सद्वारे भन्नाट कॉमेंट केल्या जात आहे.

याच संदर्भात राजस्थानच्या एका तरुणाने मुख्यमंत्र्याकडे अजब मागणी केली आहे. 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी ही फेसबुक पोस्ट केली होती. यावर अंकुर दौरवाल या फेसबुक युजरने  कॉमेंट्स केली आहे की, ‘मुख्य़मंत्री साहेब, तुम्हीच लग्नांवर रोख लावा. उद्या माझ्या प्रेयसीचे लग्न आहे, ते थांबेल. तुम्ही एक काम करा आज रात्रीच गाईडलाईन काढा, म्हणजे 5 मे पासून जेवढी लग्ने आहेत ती रद्द होती. अशोकजी प्लीज..’ राजस्थानच्या एका तरुणाने मुख्यमंत्र्याकडे अजब मागणी केली आहे.सध्या त्याची कंमेंट्स चांगलीच व्हायरल झालीय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.