पुणे – सिगारेट आणून न दिल्यामुळे सराईतांनी कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मालकावर दोघा सराईतांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे.
ही घटना काल सकाळी साडेनउच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ घडली. याप्रकरणी ओम सुरवसे (वय २१) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम यांचा घोड्यांचा व्यवसाय असून बागेजवळ मुलांना घोड्यावर बसवून व्यवसाय केला जातो. त्यांच्याकडे कामगार आहेत.
तीन दिवसांपुर्वी सराईतांना ओम यांच्या कामगाराने सिगारेट आणून न दिल्यामुळे त्यांनी मारहाण केली होती. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे काल ओम शौचालयात जात असताना सराईतांनी त्यांना अडविले. याला आज जिवंत सोडायचा नाही, असे म्हणून शिवीगाळ करीत कोयत्याने वार केला.