लशींची उत्पादनक्षमता वाढवणं ही सिरमचीही जबाबदारी – नवाब मलिक

मुंबई – देशात सिरम किंवा भारत बायोटेकला लस निर्मितीचे लायसन्स देण्यात आल्यानंतर कोण त्यांना बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करत होते याचा शोध त्यांनी लावला पाहिजे. आता जनजागृती झाल्यानंतर लोक लस घेण्याची तयारी दर्शवत आहेत. लशींची उत्पादनक्षमता वाढवणं ही काळाची गरज निर्माण झाल्याने ती सरकारबरोबर लस उत्पादक कंपन्यांचीही जबाबदारी आहे.

केंद्राला दीडशे, राज्याला आधी ४०० रुपये नंतर स्वतःच ट्विट करून ३०० रुपये दर अदर पूनावाला यांनी जाहीर केला. हे सगळं जनतेच्या मनात संदिग्धता निर्माण करणारं आहे. मात्र त्यांनी कोणीही बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.