Pune Crime | लोहगावमध्ये घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

पुणे –  बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने मिळून १ लाख २२ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ ते ३० एप्रिल कालावधीत लोहगावमधील पवारवस्तीवर घडली. याप्रकरणी जयवंत होनकळसे (वय ३९, रा. पवारवस्ती ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी जयवंत एका खासगी वंâपनीत कामाला असून पवार वस्तीवरील अमायरा व्हिला इमारतीत राहायला आहेत. २७ ते ३० एप्रिल कालावधीत ते कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ हजार २०० रूपयांची रोकड आणि दागिने असा मिळून १ लाख २२ हजारांचा ऐवज चोरून नेला.

गावाहून परत आल्यानंतर जयवंत यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात जाउन तक्रार नोंदविली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. पाटील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.