नोएडा – देशात करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र आता देशातील इतर राज्यांतही करोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथून धक्कादायक वृत्त समोर आलं असून रुग्णाने जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाला (सीएमओ) मदतीसाठी आर्त हाक मारली आहे.
माझी आई करोनाचा इलाज न मिळाल्याने मरण पावली. आता मला आणि माझ्या पत्नीला तरी वाचवा. आम्हा दोघांना काही झालं तर आमच्या दोन मुलांचं काय होणार डीएम आणि सीएमओ साहेब, असं ट्विट रुग्णाने केलं आहे.
राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाची लाट ओसरणार पण…
हे ट्विट नोएडा येथील एव्हीजे हाईटस सोसायटीतील निवासी मनिष श्रीवास्तव यांचं आहे. त्यांच्या आईचं रुग्णालयात भर्ती न केल्याने आयोसोलेशनमध्येच निधन झालं. आता मनिष आणि त्यांची पत्नी करोनाबाधित आहेत. त्यामुळे आईच्या अंत्यसंस्काराला देखील मनिष यांना जाता आलं नाही. आता सोसायटीतील इतर लोकही ट्विट करून मनिष आणि त्यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी आवाहन करत आहेत.
मनिष यांनी आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र कुठेही उपचार झाले नाही. त्यांना गाझियाबाद येथे हलविण्याचं सांगण्यात आलं. मात्र तिथही ऑक्सिजन बेड नसल्यामुळे आईला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. त्यातच त्यांचं निधन झालं. आता मनिष यांचा ऑक्सिजन ८५ पर्यंत खाली आला असून त्यांच्या पत्नीच्या फुप्फुसात इन्फेक्शन झालं आहे. यावर सीएमओ डॉ. दीपक ओहरी यांनी सांगितलं की, या प्रकरणाची माहिती नसून टीम पाठवून तपास घेऊ.
पती व मुलांनी हात लावण्यास नकार दिल्याने 8 तास पडून होता हिंदू महिलेचा मृतदेह; अखेर…