मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेची लोकप्रियता पाहून या मालिकेचे मेकर्स प्रेक्षकांसाठी याचे अॅनिमेटेड व्हर्जन घेऊन आले आहेत. ‘तारक मेहता का छोटा चश्मा’ असं या शोचं नाव आहे. हा शो खास लहान मुलांसाठी डिझाइन केलेला आहे.
उद्यापासून म्हणजेच 19 एप्रिलपासून तारक मेहता का छोटा चश्मा प्रसारित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. हा शो सोनीने मुलांसाठी तयार केलेल्या सोनी याय (Sony Yay) चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे.
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1383284210635481089
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या शोचे महत्त्वाचे पात्र पत्रकार पोपटलाल शोच्या अॅनिमेटेड व्हर्जनची माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पोपटलाल सांगतात – प्रिय दर्शकांनो, आम्ही तुमच्यासाठी तारक मेहता का छोटा चश्मा हा आणखी एक मनोरंजन कार्यक्रम घेऊन येत आहोत.