लॉस एंजलिसमधील इंडियन फेस्टिव्हलची सुरुवात 20 मे पासून होणार आहे. अजितपाल सिंग यांच्या “फायर इन द माउंटन’ या सिनेमाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर मराठी सिनेमा “स्थळपुराण’ने 27 मे रोजी या फिल्म फेस्टिव्हलची सांगता होणार आहे.
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ब्रिज, द टेमेंट, बंजारा आणि अरे कटाई चढाई कन्या आणि आणि रमत-गमत हे लघुपटही दाखवले जाणार आहेत. याशिवाय प्रकाश डेका यांचा फायर फ्लाईज हा दक्षिण भारतीय सिनेमाही दाखवला जाणार आहे.
तृतीयपंथीयांचा भारतीय सिनेमातील प्रातिनिधिक सहभाग या विषयावर एक चर्चासत्र होणार आहे. अमेरिकेतील दिग्दर्शकांनी भारतीय विषयांवर केले चित्रपट हा या महोत्सवाचा मुख्य गाभा असणार आहे.