नवी दिल्ली -फ्युचर रिटेल व रिलायन्स रिटेल दरम्यान झालेल्या व्यवहारावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात ऍमेझॉन कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने फ्युचर रिटेल व रिलायन्स रिटेलच्या व्यवहारावरील बंदी उठविली आहे. हा व्यवहार आमच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही असे ऍमेझॉनचे म्हणणे आहे. याअगोदरही हे प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादात गेले आहे. या विषयावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.