लस उत्पादनासाठी प्रोत्साहन आवश्‍यक

उद्योजकांच्या संघटनेची सरकारला सूचना

नवी दिल्ली – भारतामध्ये आतापर्यंत केवळ दहा कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. याचा अर्थ 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण झालेले नाही. यासाठी लस मोठ्या प्रमाणात लागणार आहे. याकरिता लस उत्पादन केंद्रे वाढवावी लागणार आहेत. अशा केंद्रांना उत्पादन आधारित प्रोत्साहन देण्याची गरज उद्योजकांची संघटना असलेल्या फिक्‍कीने व्यक्त केली आहे.

काही कंपन्या लस निर्माण विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना कच्चा माल आणि इतर कामांसाठी सरकारने अनुदान देण्याच्या शक्‍यतेवर विचार करावा. सध्या देशामध्ये काही ठिकाणी लसीचे उत्पादन सुरू आहे. या लसींच्या किमतीला केंद्र सरकारने मर्यादा घातलेली आहे. त्यामुळे लस उत्पादन नफादायक होण्यासाठी ही सरकारने या कंपन्यांना काही प्रमाणात अनुदान देण्याची गरज आहे.
रशियाच्या स्फुटनिक-5 या लसीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत फिक्कीने म्हटले आहे की, इतर देशांमध्ये तयार झालेल्या आणि सर्व निकष पूर्ण करीत असलेल्या लसीची आयात करणे किंवा लसीचे देशात उत्पादन करण्याबाबत केंद्र सरकारने खुली भूमिका ठेवावी.

भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात लस निर्माण होत असूनही भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण थांबवावे लागणार आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी केंद्र आणि राज्यांनी लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने आवश्‍यक उपाययोजना करण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत भारतातील 30 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प सरकारने जाहीर केलेला आहे. मात्र आतापर्यंत केवळ दहा कोटी लोकांचे लसीकरण झालेले आहे. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लसीकरणाचा वेळ वाढवावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.