मुंबई – बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. रणवीर हा तमिळ चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस. शंकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट साउथमधील ब्लॉकबस्टर “अन्नियन’चा हिंदी रीमेक आहे. हा एक पॅन-इंडिया चित्रपट असणार असून, तो 2022मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
“अन्नियन’मध्ये विक्रमने मुख्य भूमिका साकारली होती. तर या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणवीर सिंहचा “83′ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. हा चित्रपट जूनमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीसह “सर्कस’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे.