नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्याने त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
RSS Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat today tested Corona positive. He has normal symptoms and admitted to Kigsway hospital Nagpur.
— RSS (@RSSorg) April 9, 2021
सध्या भागवत यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील रात्री उशिरा याबाबत ट्विट केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्यांना लवकरच बरं वाटावं, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत के कोरोना पॉजीटिव होने की खबर मिली। उन्हें शीघ्र स्वास्थ्य लाभ मिले ईश्वर से यही कामना करता हूं।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 9, 2021
मागील चोवीस तासात देशात 1 लाख 30 हजार हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातही महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होतं असल्याचं चित्र आहे. राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊनही सुरू झाले आहे. नागपूर, पुणे आणि मुंबई यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.
वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि कोरोनासोबत लढा देण्यासाठी उपाययोजनाही सुचवल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे.