मुंबई – आयपीएल स्पर्धा ज्या कालावधीत होते, त्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे तसेच मालिकांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन इंग्लंडचा माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक केवीन पीटरसनने आयसीसीला केले आहे.
आयपीएलमधून माघार घेत राष्ट्रीय संघाला प्राधान्य देण्याबाबत कोणत्याही देशाचे क्रिकेट मंडळ दडपण टाकू शकत नाही. मात्र, विनाकारण खेळाडूंना दबावाखाली आणण्यापेक्षा पुढील काळात आयपीएलचे वेळापत्रक पाहुनच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे तसेच मालिकांचे आयोजन केले जावे, असेही पीटरसनने म्हटले आहे.