पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ‘प्रमोद भगत’ला तीन पदके

दुबई – जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या भारताच्या प्रमोद भगतने दुबईत झालेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी एकूण तीन पदके मिळवली. याचप्रमाणे क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सुकांत कदमने दोन रजतपदके मिळवली आहेत.

एसएल-4 गटात प्रमोदने एकेरीत कुमार नितेशवर 21-17, 21-18 असा विजय मिळवला. त्यानंतर दुहेरीत मनोज सरकारच्या साथीने सुकांत कदम आणि नितेश कुमार जोडीचा 29 मिनिटांत 21-18, 21-16 असा पराभव केला.

मिश्र दुहेरीत प्रमोदने पाला कोहलीच्या साथीने ब्रॉंझपदक मिळवले. एसएल-3 गटात एकेरीच्या अंतिम फेरीत फ्रान्सच्या लुकास मॅझूरकडून 21-15, 21-6 अशा फरकाने पराभव पत्करल्याने सुकांतला उपविजेतेपद मिळाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.