पुणे – दिवसभरात 4,077 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या बाधितांचा समावेश करून शहरात आतापर्यंत एकूण 2 लाख 94 हजार 121 बाधितांची नोंद झाली आहे.
रविवारी प्रयोगशाळेतील बहुतांश मनुष्यबळाला सुटी असते त्यामुळे सोमवारी बाधितांची संख्या कमी दिसत होती. मात्र, दररोज किमान 20 हजारच्या पुढे टेस्टिंग होत असल्याने ही संख्या मंगळवार, बुधवारी वाढू शकते.
दरम्यान, सोमवारी 18,720 संशयितांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. एकूण बाधितांमधील 42 हजार 741 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यातील 919 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 46 बाधितांचा मृत्यू झाला असून, 10 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. त्यांचा समावेश करून एकूण 5 हजार 488 बाधितांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.