पुणे -जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात करोनाचे एकूण 6 हजार 206 नवे रुगण आढळून आले आहेत. तर 6 हजार 55 करोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्यस्थितीत जिल्ह्यात करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 हजार आहे. ग्रामीण भागात सुध्दा करोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी 1 हजार 88 रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहे.
यामध्ये नगरपंचायत हद्दीमध्ये 276 तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये 812 करोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात 3 हजार 226, पिंपरी चिंचवडमध्ये 1 हजार 837, कॅन्टोंन्मेंट भागात 55 करोनाचे रुग्ण आढळले आहेत. 14 हजार 242 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 44 हजार 867 गृह विलगीकरणात आहेत.