पुणे(प्रतिनिधी) – गजा मारणेसह साथीदारांचा तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात सत्र न्यायाधीश व्ही. पी. अदोणे यांनी अटकपूर्व जामीन फेटाळला.
गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 48, रा. शास्त्रीनगर), रूपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत संभाजी पवार (वय 34), गणेश नामदेव हुंडारे (39), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय 36), बापू श्रीमंत बागल (वय 34), अनंता ज्ञानोबा कदम (वय 37), सचिन अप्पा ताकवले (वय 23) आणि संतोष शेलार अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत.
या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना सहायक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला