प्रभात ऑनलाइन – व्यसन कोणतेही असो, ते वाईटच असते. त्यातही दारू आणि सिगरेटचे व्यसन एकदा जडले की सुटणे कठीण. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकेकाळी इतके धूम्रपान करत होते की त्यांच्यासाठी सिगारेट सोडणे अशक्य होते परंतु या कलाकारांनी अगदी जिद्दीने स्वतःला या व्यसनापासून सोडवले. चला तर मग, जाणून घेऊ कोणते कलाकार होते एकेकाळी चेनस्मोकर आणि त्यांनी या व्यसनातून बाहेर येण्यासाठी नेमके काय केले.
1. कोंकणा सेन
अभिनेत्री कोंकणा सेन एकेकाळी चेनस्मोकर होती, परंतु ती गर्भवती झाल्यापासून तिने स्वत: ला सिगारेटपासून दूर केले होते. कोंकणाने एका मुलाखतीत स्पष्ट केले की आई झाल्यानंतर अधिक जबाबदारीने वागण्यासाठी आणि स्वतःच्या व बाळाच्या आरोग्यासाठी मी आयुष्यातून धूम्रपान करणे बंद केले.
2. मनीषा कोईराला
संवेदनशील अभिनेत्री मनीषा कोइरालाची कारकीर्द तिच्या मादक पदार्थांच्या व्यसनांमुळे, धूम्रपानानंतर संपली. त्यामुळे तिचे वजनही लक्षणीय वाढले होते, परंतु कर्करोगाच्या आजाराची माहिती मिळताच तिने तिची सगळे व्यसन सोडले.
3. पूजा भट्ट
अभिनेत्री पूजा भट्टला देखील सिगरेटचे व्यसन लागलेले होत. मात्र, वडील महेश भट्ट यांच्या एका पत्राने तिला हे व्यसन सोडण्यास भाग पाडले.
4. सैफ अली खान
एक काळ असा होता की अभिनेता सैफ अली खानला सिगारेट पिण्याचे व्यसन जडले होते. या सिगारेटच्या व्यसनामुळे त्याला एकदा हृदयविकाराचा झटकादेखील आला. मीडिया रिपोर्टनुसार सैफने त्यानंतर धूम्रपान सोडले.
5. हृतिक रोशन
बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन धूम्रपान करायला इतका त्रास झाला होता. मात्र प्रख्यात लेखक एलन कारचे पुस्तक ‘ईझी वे टू स्टॉप स्मोकिंग’ वाचल्यानंतर हृतिकने सिगारेट सोडली. सध्या तो सिगरेटपासून पूर्णपणे दूर आहे.
6. आमिर खान
मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता आमिर खानही खूप स्मोकिंग करायचा. हे व्यसन सोडण्याचा त्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाला. पण पहिल्या पत्नीने मुलगा आझादला जन्म दिल्यानंतर आमिरने सिगारेटला स्पर्शही केला नाही.
7. अजय देवगण
अभिनेता अजय देवगणही एकेकाळी खूप धूम्रपान करायचा. पण काजोलशी लग्नानंतर त्याने हे व्यसन सोडले. वास्तविक एक दिवस काजोलच्या एका काकांचे अति धूम्रपाणामुळे अकाली निधन झाले होते. त्यानंतर, काजोलने अजयला सिगारेटपासून दूर राहण्यास सांगितले.
8. सलमान खान
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान एकेकाळी चेन स्मोकिंग करणारा होता, परंतु काही काळापूर्वी एका ट्रीटमेंटमुळे सल्लू भाईला सिगारेट सोडावी लागली होती. त्यानंतर तो खूप हेल्थ कॉन्शस झाला आहे.
9. रणबीर कपूर
अभिनेता रणबीर कपूरसुद्धा महाविद्यालयीन काळापासूनच सिगारेट ओढत होता. पण आई नीतू कपूरच्या सांगण्यावरून त्याने धूम्रपान सोडले.
10. नाना पाटेकर
अभिनेता नाना पाटेकरदेखील एकेकाळी चेन स्मोकर होते. पण एक दिवस त्यांच्या बहिणीने त्यांना धूम्रपान सोडण्याची विनंती केली. तेव्हापासून नाना पाटेकर यांनी हातात सिगारेट घेतलेली नाही.