नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येतील चिंताजनक वाढ आजही कायम असल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यात आज रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही घसरण झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे नगर जिल्हा पुन्हा एकदा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात आज 271 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 75 हजार 713 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आज 96.21 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्णसंख्येत 337 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्याही वाढली असून, आता ती 1हजार 820 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 131, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 182 आणि अँटीजेन चाचणीत 24 रुग्ण आज बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 52, अकोले 04, जामखेड 03, कर्जत 02, कोपरगाव 18, नगर ग्रामीण 06, नेवासा 04, पारनेर 07, पाथर्डी 04, राहाता 18, राहुरी 03, शेवगाव 07, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 43, अकोले 03, जामखेड 01, कर्जत 01, कोपरगाव 06, नगर ग्रामीण 03, नेवासा 09, पारनेर 03, पाथर्डी 02, राहाता 31, राहुरी 06, संगमनेर 39, शेवगाव 02, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 19, कॅन्टोन्मेंट 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 24 जण बाधित आढळुन आले. मनपा 08, जामखेड 01, नगर ग्रामीण 02, नेवासा 04, पारनेर 01, पाथर्डी 02, राहाता 04, राहुरी 01, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 87, अकोले 09, कर्जत 02, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 21, नेवासा 09, पारनेर 12, पाथर्डी 31, राहाता 15, राहुरी 03, संगमनेर 28, शेवगाव 16, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 09, कॅन्टोन्मेंट 01, मिलिटरी हॉस्पिटल 01, आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या : 75713
उपचार सुरू असलेले रूग्ण : 1820
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1163
एकूण रूग्ण संख्या : 78696