बासेल – भारताची फुलराणी सायना नेहवालला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
येथे सुरू असलेल्या स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सायनाला थायलंडच्या पट्टीयापोर्न याचवानकडून 21-16, 17-21 व 23-21 असा पराभव पत्करावा लागला.
ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने मात्र, दुसरी फेरी गाठली. सिंधूने पहिल्या फेरीच्या सामन्यात टर्कीच्या यीगीट नेस्लीहानचा 21-16, 21-19 असा सहज पराभव केला.