Hockey | महिला हॉकी संघाचा जर्मनीकडून पराभव

डसेलडॉर्फ – भारतीय महिला हॉकी संघाच्या बचावफळीने चांगली कामगिरी करूनही त्यांना तुल्यबळ जर्मनीविरुद्ध तिसऱ्या सामन्यातही 2-0 असा पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या मालिकेत जर्मनीने 3-0 अशी आघाडी घेतली.

सोंजा झिम्मेरमान (26 वे मिनिट) आणि फ्रान्सिस्का हॉक (42 वे मिनीट) यांनी गोल केले. पूर्वार्धातील पहिल्या दोन्ही सत्राच्या सुरुवातीला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र, त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही.

सामन्याच्या तिसऱ्या सत्रात मिळालेला तिसरा कॉर्नर मात्र सत्कारणी लावण्यात जर्मनीच्या झिम्मेरमान हिला यश आले. त्यानंतर तिसरे सत्र संपताना त्यांनी आणखी एक गोल केला. यानंतर आघाडी टिकवणे त्यांना फारसे जड गेले नाही. आता मालिकेतील अखेरचा सामना गुरुवारी खेळविला जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.