वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे अमेरिकेने स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी जम्मू काश्मीर राज्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर अत्यंत काटेकोरपणे शस्त्रसंधी नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकन संसदेच्या विदेश व्यवहार समितीचे प्रमुख ग्रेगरी मीक यांनी म्हटले आहे की, ही एक महत्वाची आणि दिलासादायक घडामोड आहे. दोन्ही देशांमध्ये कायम स्वरूपी शांतता नांदण्यासाठीचे हे एक महत्वाचे पाऊल आहे.दोन्ही देशांमध्ये गुरूवारी हा करार झाला आहे.
अमेरिकेतील हिंदु फाऊंडेशननेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पाकिस्तानने हा करार प्रामाणिकपणे पाळावा आणि भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांना मदत करणे थांबवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.