सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (दि. 31 जानेवारी) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 65 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर गेल्या 24 तासांमध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी दिली. दरम्यान, जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर स्थिर आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात आठ, लिंब दोन, शाहूपुरी, करंडी, तामजाईनगर, वनगळ, फत्यापूर, वेळेकामथी प्रत्येकी एक, कराड तालुक्यात हजारमाची एक, फलटण तालुक्यात खडकी दोन, जाधववाडी एक, खटाव तालुक्यात वडूज पाच, खटाव, लाडेगाव, मायणी, औंध, कळंबी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात सासुर्वे पाच, कोरेगाव, सुर्ली प्रत्यकी दोन, रहिमतपूर, साप, कुमठे प्रत्येकी एक,
जावळी तालुक्यात म्हसवे, कुडाळ प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात खंडाळा, शिंदेवाडी, शिरवळ, म्हावशी, अहिरे प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात चाफळ, कोकिसरे, गुंजाळी, अटोळी प्रत्येकी एक,
महाबळेश्वर तालुक्यात लिंगमळा दोन, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक चार, हस्तनपूर, मार्डी, दहिवडी, शेवरी, गोंदवले खुर्द प्रत्येकी एक, इतर एक, असे 65 जण बाधित आहेत. दरम्यान, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, चिमणगाव, ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात करोनाबळींची एकूण संख्या 1819 झाली असून मृत्युदर जास्त आहे.