ठोसेघर ( Gram Panchayat Results 2021 ) – परळी खोऱ्यातील महत्त्वाच्या व पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठोसेघर ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रराजे गटाचे शिलेदार पुन्हा हिरो ठरले आहेत. त्यांनी शिवसेनाला “क्लीन स्विप’ दिली आहे.
ठोसेघर ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल उभे केले; परंतु शिवेंद्रराजेंचे खंदे समर्थक व माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण व जयराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील केदारनाथ पॅनेलने शिवसेनेच्या पॅनलचा धुव्वा उडवून सर्व सात जागा जिंकल्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहितेंनी मोर्चा संभाळला होता. ( Gram Panchayat Results 2021 )
पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितिन बानगुडे-पाटील यांनीही मतदारांच्या गाठीभेटी व सभा घेतली होती. त्यामुळे शिवसेना राजे गटाला सुरुंग लावणार का, याची उत्सुकता होती; परंतु शिवेंद्रराजेंच्या गटाने शिवसेनेला भोपळाही फोडू दिला नाही. ( Gram Panchayat Results 2021 )