बॉलीवूड “क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना राणावत लवकरच “मणिकर्णिका रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. “मणिकर्णिका’मध्ये झांसीच्या राणीची कथा दाखवली गेली होती. तर या आगामी “मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटात काश्मीरच्या राणीची कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगनाने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
कमल जैन सोबतचा फोटो शेअर करत कंगना म्हणाली, झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांच्या शौर्याचा साक्षी आपला भारत देश आहे. अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची. ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी “मणिकर्णिका रिटर्न्स: दी लिजेंड ऑफ दिद्दा’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी “धकड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या ती भोपाळमध्ये चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे. आता ती भोपाळला गेली असताना कंगनाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचीही भेट घेतली होती.