बॉलीवूडमध्ये रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांना अनेकवेळा एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे. मात्र, रणबीर कपूरला त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत पुन्हा एकत्रित पाहण्यात आले आहे.
एकेकाळी रणबीर आणि कतरिना यांच्या अफेअरची चर्चा रंगत होती. ही जोडी त्यांच्या चाहत्यांची फेव्हरिट होती. सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफने ब्रेकअप केले होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी कधीच आपल्या ब्रेकअपचे कारण मीडियात सांगितलेले नाही. आता ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांनी नुकतेच एका जाहिरातीमध्ये सोबत काम केले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मात्र, कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे.
कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपला जवळपास दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी एका मोबाइल कंपनीची जाहिरात नुकतीच शूट केली आहे. या शूटवेळी त्यांनी बरीच धमाल देखील केली हे व्हिडिओत पाहायला मिळते आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात लवकरच पाहायला मिळणार आहे.