पिंपरी – चित्रपट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून एका चित्रपट निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमोल लक्ष्मण कागणे (वय 29, रा. जांभुळकर चौक, वानवडी, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम धाकतोडे (वय 38, रा. राहुलनगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2019 ते 22 जून 2020 या कालावधीत केपीआयटी कमिन्स जवळ, हिंजवडी येथे आणि ऑनलाईन माध्यमातून घडला आहे.
फिर्यादी कागणे हे चित्रपट निर्माती व विक्रीचा व्यवसाय करतात. तर आरोपी धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतो. धाकतोडे याने काही चित्रपट कागणे यांच्या नावावर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी त्याने कागणे यांच्याकडून पैसे घेतले. जे चित्रपट त्याने विकत घेतले त्याची कागणे यांच्या परस्पर विक्री करून त्याचा मोबदला कागणे यांना न देता फसवणूक केली.