संक्रात स्पेशल: काळ्यारंगाच्या साडीत अमृताच्या सौंदर्याला लागले चार चाँद

फोटो पाहून फॅन्स म्हणाले; अरे कोई फायर ब्रिगेड बुलावो...

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’नं प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. अमृताला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती.

‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर ‘मुंबई साल्सा’ या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी अमृताने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

मराठी सिनेमांप्रमाणेच अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं. अमृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर फॅन्ससह शेअर करते.

नुकतंच संक्रात निमित्त अमृताने इंस्टाग्रामवर एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्यारंगाची साडी परिधान केली असून, या साडीत तिच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या अमृताचा लूकआणि फॅशन सगळ्यांन पेक्षा अतिशय हटके असते.

तसेच अमृताने या फोटो खाली एक कॅप्शन सुद्धा दिल असून, आपल्या फॅन्सला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! दिल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.