धनंजय मुंडे अडचणीत; राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अखेर यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले कि, धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, भाजपचे हे काम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बलात्कराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असून माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहे.

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिल्याचेही मुंडे यांनी नमूद केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.