नवी दिल्ली : खासगी विमान कंपनी इंडिगोने एक धक्कादायक खुलासा केला आहे. डिसेंबर महिन्यात आमचे सर्व्हर हॅक झाले होते, अशी खळबळजनक माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे. या दरम्यान हॅकर्सनी कंपनीचे काही इंटर्नल डॉक्युमेंट्स चोरल्याची भीती व्यक्त होत असून चोरलेले कागदपत्र हॅकर्सकडून सार्वजनिक संकेतस्थळांवर अपलोड केले जाऊ शकतात अशी शंकादेखील कंपनीने व्यक्त केली आहे.
There were some segments of data servers that were breached – so, there is a possibility that some internal documents may get uploaded by the hackers on public websites & platforms: IndiGo https://t.co/59sozUztTK
— ANI (@ANI) December 31, 2020
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला इंडिगोचं सर्व्हर हॅक झालं होतं, अशी माहिती कंपनीकडून एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. पण हॅक झाल्यानंतर खूप कमी कालावधीत सर्व्हरवर पुन्हा ताबा मिळवण्यात यश आले, असेही कंपनीने सांगितले.
मात्र यावेळी हॅकर्सनी कंपनीचे काही इंटर्नल डॉक्युमेंट्स चोरले असल्याची भीती इंडिगोने व्यक्त केली असून चोरलेले कागदपत्र सार्वजनिक वेबसाइट्सवर अपलोड केले जाण्याची शक्यताही कंपनीने वर्तवली आहे.
दरम्यान, ‘या घटनेचं गांभीर्य आम्ही जाणतो, त्यामुळे घटनेचा सखोल तपास करता यावा यासाठी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहोत’ अशी माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे.