नवी दिल्ली – फिरोजशाह कोटला स्टेडियममधील एका स्टॅण्डला दिलेले आपले नाव तातडीने हटवावे अन्यथा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भारताचे माजी कसोटीपटू बिशनसिंग बेदी यांनी दिला आहे.
बेदी यांनी संघटनेला पत्र पाठवून या स्टेडियमवर संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांचा पुतळा बसवण्याविषयी कडाडून टीका केली होती. यावर संघटनेकडून कोणतेही प्रत्युत्तर न मिळाल्यामुळे संतापलेल्या बेदी यांनी आणखी एक पत्र लिहून थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व बीसीसीआयचे सदस्य अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.