मुंबई – बजाज ऑटो 650 कोटी रुपये गुंतवणुकीचा नवा प्रकल्प चाकणमध्ये सुरू करणार आहे. यासंदर्भात बजाज ऑटो आणि महाराष्ट्र सरकारदरम्यानच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
शेअर बाजारांना उपलब्ध केलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, या प्रकल्पातील उत्पादन 2023 मध्ये सुरू होईल. या ठिकाणी केटीएम, ट्रायम्प इत्यादी उच्च दर्जाच्या दुचाकी तयार करण्यात येईल.
या संदर्भात आवश्यक परवानगी, नोंदणी आणि उपलब्ध आर्थिक उत्तेजन महाराष्ट्र सरकार उपलब्ध करणार असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्यात बजाज ऑटोचे अनेक प्रकल्प आहेत. आगामी काळातही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची कंपनीची इच्छा यातून दिसून येते असे बजाज ऑटोने म्हटले आहे.