मुंबई – भारतीय संघाला अपयशाच्या गर्तेतून बाहेर काञण्यासाठी तंत्रशुद्ध फलंदाज व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविड याला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावे. त्याच्या मार्गदर्शनामुळे संघातील खेळाडूंना आत्मविश्वास मिळेल, असा सल्ला माजी कर्णधार व निवड समितीचे मी अध्यक्ष दीलीप वेंगसरकर यांनी दिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच सघाने दुसऱ्या डावात 36 धावांची नीचांकी धावसंख्या नोंदवली. यामुळे सध्या संघावर विविध स्तरांतून टीका सुरु आहे. त्यात वेंगसकर यांनी चाहत्यांना संयम राखण्याचे तसेच टोकाची टीका न करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली हे मान्य आहे. पण हे तेच खेळाडू आहे ज्यांनी अनेक सामने कठिण परिस्थितीतूनही जिंकून दिले आहेत. असे एखाद्या सामन्यात अपयश येते पण त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर शंका घेतली जाऊ नये, असे वेंगसरकर यांनी सांगितले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवावे. नेटमध्ये सराव करताना भारतीय समघातील खेळाडूंना द्रविडच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ होईल. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे व कोणत्याही फलंदाजाला त्याच्या तंत्रात सुधारणा करण्यासाठी काय करावे हे सांगण्यासाठी द्रविड इतका उत्तम पर्याय कोणताही नाही.
ऑस्ट्रेलियातील वातावरणात तसेच त्यांच्या गोलंदाजीवर कसे खेळले पाहिजे. तसेच नेटमध्ये सराव करताना कशावर भर दिला पाहिजे हे द्रविड अत्यंत योग्य पद्धतीने सांगू शकतो. भारतीय संघाला पुढील तीनही कसोटी कोहलीशिवाय खेळायच्या आहेत. करोनाच्या नियमानूसार द्रविडला तेथे दाखल झाल्यावर विलगीकरणात राहावे लागले तरी तो खेळाडूंना मार्गदर्शन करु शकतो. हा पर्याय बीसीसीआयने वापरुन पहायला काहीही हरकत नाही, असेही ते म्हणाले.
द वॉलच तारणहार ठरेल
द्रविडने त्याच्या संपूर्ण कारकिर्दित ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्याकडे तेथील वातावरण तसेच त्यांच्या योजनांची परिपूर्ण माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची तसेच खेळाडूंची मानसिकताही त्याला चांगली अवगत आहे. अशा संघाविरुद्ध खेळताना भारतीय खेळाडूंनी काय केले पाहिजे हे त्याच्याशिवाय अन्य कोणीही योग्य रितीने सांगू शकणार नाही. द्रविडला द वॉल म्हणतात मग हीच वॉल भारत व पराभव यांच्यात उभी राहिल, असा विश्वासही वेंगसरकर यांनी व्यक्त केला.