कार्ला – वेहरगाव येथील प्रसिद्ध गाडामालक सुरेश हुकाजी गायकवाड यांच्या केटीएम (लक्ष्या) या बैलाने मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यात अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या अशा या नामवंत बैलाचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाल्याने बैलगाडा शौकीनांसह कार्ला परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गायकवाड कुटुंबीय बैलांची जीवापाड संभाळ करत आहे. एक एकर शेतीवर बैलांकरीता वातानुकुलित गोठा, बैलांवर लक्ष व त्यांची सेवा करण्यासाठी माणसे बारमाही हिरवा चारा, खुराक अशा स्वरुपात बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना देखील सेवा त्यांची निगा राखली जात होती.
लक्ष्या उर्फ केटीएमने अनेक शर्यतीत आपल्या हिमतीवर प्रथम क्रमांक तर बिनजोड शर्यती जिंकून पुणे जिल्ह्यात आपले व आपल्या मालकाचे नाव या मोठे केले.
आजारी झाल्यापासून अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर येउन उपचार करत होते. पण त्यांना यश आले नाही व त्यात बैलाचे निधन झाले.