वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पुणे ते गोवा सायकल प्रवास

अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविण्याचा सामाजीक संदेश

पुणे – फिटनेस प्रेमी असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पुणे ते गोवा हा 555 किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पुर्ण केला. त्यांच्या समवेत इतर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती होत्या. अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविण्याचा सामाजीक संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. हा प्रवास 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान पार पडला.

समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील सहकाऱ्यांच्या मदतीने पुणे ते गोवा (कोस्टल मार्ग) हा खडतर प्रवास यशविरित्या पुर्ण केला.

दररोज 100 किलो मीटरचा प्रवास आणी स्थानिक ठिकाणी रात्रीचा थांबा असा त्यांचा नित्यक्रम होता. पुणे-महाड-गुहागर-पावस-देवगड-मालवण-गोवा असा मार्ग आखत त्यांनी सायकल प्रवास केला. त्यांच्या टीममध्ये 14 ते 56 वयोगटातील 17 सायकल पट्टूंचा समावेश होता.

ताम्हाणे यांच्यासोबत त्यांचा मुलगा गौरांग ताम्हाणे, डॉ.स्वप्ना आठवले, उद्योजक अमोल व प्राची उपळेकर, सीए विजय अनपट, आयटी तज्ञ डॉ.भीमाप्पा देसाई, अनिकेत जोशी, रणजित, सिमा ननवरे, प्रसाद खांडेकर, शिला नगरकर, आकाश नगरकर, सुधा कानडे, निलाक्षी बक्षी सहभागी झाल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.