सेटवरच कोसळले मिथुन दा; ‘त्या’ अवस्थेतही पूर्ण करायचे होते शूटिंग

मुंबई – बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक खालावल्याने ते सेटवरच कोसळले. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित मसुरीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे शूटिंग चालू होते.

‘द कश्मीर फाइल्स’ मध्ये मिथुन चक्रवर्ती महत्वाची भूमिका निभावत आहेत. यावेळी शूटिंग सुरु असतानाच अचानक मिथुन दा सेटवरच कोसळले. फूड पॉयझनिंगमुळे त्यांची प्रकृती खालवल्याची माहिती मिळत आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

निर्माते आणि सेटवरील सर्वांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये यासाठी मिथुन चक्रवर्ती आजारी असतानाही शूटिंग सुरू करा असे म्हणत होते. पण दिग्दर्शकांनी त्यांना आराम करण्याची विनंती केली, अशी माहिती विवेक अग्निहोत्री यांनी दिली.

दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट  जम्मू-काश्मीरमधील पंडितांच्या  हत्याकांड आणि निवर्सनावर असणार आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनुपम खेर आणि पुनीत इस्सरही असणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.