नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील सामान्यांपासून ते सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
अशातच बॉलीवूड अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांनीसुद्धा ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. सनी देओल म्हणाले कि, “मी माझ्या पक्षासोबत आणि शेतकऱ्यांसोबत आहे आणि नेहमी शेतकऱ्यांसोबत असेन. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला आहे आणि मला विश्वास आहे की सरकार त्यांच्यासोबत चर्चा करुन योग्य निकालापर्यंत पोहोचेल, असं सनी म्हणाले. सध्या सनी देओल यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
I stand with BJP and farmers; govt always thinks of farmers’ betterment: Sunny Deol
Read @ANI Story | https://t.co/CcsSrbKgwr pic.twitter.com/quL9Sulz0E
— ANI Digital (@ani_digital) December 6, 2020
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2020