बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित “आरआरआर’ चित्रपटाची चाह आणखी एक सुपरस्टार सहभागी झाला आहे आणि तो इतर कोण नसून बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आहे.
अजय देवगण आणि आलिया भट्टनंतर आमीर खानच्या या पीरियड ड्रामा चित्रपटात सहभागी झालयाने आणखीन रोमांच निर्माण झाला आहे. तथापि, आमीर खान या चित्रपटात अभिनय करताना दिसणार नाही, तर तो या चित्रपटासाठी व्हॉईसओव्हर देणार आहे. ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यासह आलिया भट्ट आणि अजय देवगण काम करणार आहेत. करोना व्हायरसमुळे सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले. आता या चित्रपटाविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे.
या चित्रपटात व्हॉईसओव्हर देण्यास आमिर खानने तोंडी होकार दिला आहे. आमीर आपल्या व्हॉईसओव्हरने ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांचा जगातील दर्शकांना परिचय करून देणार आहे. त्याचा व्हॉईसओव्हर केवळ चित्रपटातच नव्हे तर ट्रेलरमध्येही वापरला जाणार आहे.
दरम्यान, “आरआरआर’मध्ये प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी कोमारम भीमा आणि अल्लूरी सीताराम राजू यांची कथा दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात बॉलीवूड स्टार्सशिवाय हॉलीवूडचे दोन स्टारही दिसणार आहेत. हा चित्रपट जगातील 10 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे बजेट 400 कोटींच्या जवळ असल्याचे सांगितले जाते.