पुणे (प्रभात वृत्तसेवा) – करोना लसीच्या स्थितीची माहिती जाणून घेण्यसाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी करोना प्रतिबंधक लस निर्मितीची परवानगी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर जुलै 2021 पर्यंत सुमारे 10 कोटी लसीच्या डोसची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट संस्थेचे असेल. शिवाय दरमहा पाच ते सहा कोटी डोसची निर्मिती करू शकतो; हळुहळू ते प्रमाण वाढवण्यात येईल, अशी माहिती “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी शनिवारी वार्ताहर परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी “सीरम इन्स्टिट्यूटला ऑफ इंडिया’ला भेट दिली. त्यावेळी त्यांनी लसीच्या संशोधन, उत्पादन या विषयाची माहिती घेऊन चर्चा केल्याचे पुनावाला यांनी सांगितले.
विशेषत: लस निर्मिती झाल्यानंतर त्याची किंमत, वितरण, उपलब्धता आणि महत्त्वाचे म्हणजे परवाना (लायसन्स) या सगळ्या विषयावर या भेटीत चर्चा झाल्याचे पुनावाला यांने नमूद केले. तसेच कमी कालावधीत जास्तीतजास्त डोसची निर्मिती संस्थेतर्फे करण्याचा प्रयत्न राहील. याशिवाय वेगवेगळ्या तापमानाला लस टिकून, सुरक्षित राहील याचीही सज्जता, नियोजन करणार असल्याची खात्रीही संस्थेतर्फे पंतप्रधानांना दिल्याचे पुनावाला म्हणाले.
सुरूवातीच्या टप्प्यात ज्यांना लस द्यायची आहे, त्यांचा वयोगट निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर 18 पेक्षा कमी असलेल्या लहान मुलांच्या वयोगटाचा विचार केला जाणार केला जाऊ शकतो. अर्थात हे सगळे नियोजन केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडूनच होणार असून, त्यांच्या मागणीनुसार आणि नियोजनानुसार पुढील पावले उचलली जातील.
लसीच्या संदर्भात विविध अफवा पसवल्या जात आहेत. परंतु नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवण्याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून त्याची खात्री करून घ्यावी, उगाच संवेदनशील होऊन किंवा घाबरून, अफवा पसरवून, भितीदायक वातावरण निर्माण करू नये असे आवाहन पुनावाला यांनी केले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली करोनावरील लस ही इतकी प्रभावशाली आहे की यामुळे “झिरो हॉस्पिटलायझेशन’ होईल, अशी खात्री सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. शरीरात शिरकाव केलेले करोनाचे 60 टक्के व्हायरस या लसीमुळे संपून जातील. एवढेच नव्हे तर यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही, असाही दावा पुनावाला यांनी यावेळी केला.