पुणे (प्रभात वृत्तसेवा) – मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी विशाल शिवाजी शेळके (वय 20 रा. भोलेनगर दत्तनगर कात्रज) याला अटक केली. 17 नोव्हेंबर रोजी दत्ता मारुती नांदुरे (रा.शनिनगर आंबेगाव खुर्द) आणि परमेश्वर फुलपगार यांना मारहाण करून सात हजार 200 रुपयांची जबरी चोरी करण्यात आली होती. या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार पथकातील इतर अंमलदारासह पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी अंमलदार प्रणव संकपाळ आणि शिवदत्त गायकवाड यांना माहिती मिळाली की, या गुन्हयामध्ये विशाल शेळके याचा सहभाग असुन तो सध्या शनिनगर चौक येथे पानटपरीवर थांबलेला आहे.
ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांना कळविण्यात आली. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना सांगितले. त्यांनी ताबडतोब कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पथकाने सापळा लावुन शेळके याला ताव्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली. त्यावेळी तीन अल्पवयीन तीन साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली.
त्याचेकडुन दाखल गुन्हयातील जबरीने चोरुन नेलेली रोख रक्कम जप्त करणेत आलेली आहे. त्यानंतर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेणेत आलेले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक जर्दे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील,
सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस अंमलदार श्रीधर पाटील, निलेश खोमणे, प्रणव संकपाळ, समीर वागसिराज, हर्षल शिंदे, संतोष अनुषे, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.